पुणे शहराला (Pune) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले. पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे शहरासह उपनगरात सध्या विजांच्या कडकाटासह जोरदार पाऊस पडत आहे. लोहगाव, भवानी पेठ, स्वारगेट, विमाननगर, धानोरी, भोसरी आणि शहरातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.
पुण्यात पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने स्वारगेट बस स्थानकामध्ये पाणीच पाणी झाले आहे. स्वारगेट बस स्थानकात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक बस पाण्यामधून बाहेर काढताना चालकांचे देखील हाल होत आहे. बस पाण्यामध्येच उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी पाण्यातूनच जावे लागत आहे.
पुणे शहरातील धानोरी परिसरात रस्ते तुंबले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहे. या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे पुणे -मुंबई रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या महामार्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहे.
विमाननगर परिसरातील एअरपोर्ट रोड पाण्याखाली गेला आहे. या परिसरात देखील वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या विमाननगर सिंबायोसिस रस्त्यावर गाडीवर झाड पडल्याने प्रवासी अडकून पडले होते. त्यांना भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी बाहेर काढण्यास मदत केली. तर पुण्यात पावसामुळे शनिवार वाड्याच्या संरक्षण भिंतीवर झाड कोसळले. अनेक ठिकणी दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या.
पुण्यातील मुसळधार पावसाचा फटका राजकीय नेत्यांच्या सभांना देखील बसला. या पावसामुळे पुण्यातील शरद पवारांची सभा रद्द करण्यात आली. पुण्यात होणारी महाविकास आघाडीची सभा अखेर रद्द करण्यात आली. पुण्यातील वडगाव शेरी भागात आज शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा होणार होती. मात्र दुपारी आलेल्या पावसाने सभास्थळी पाणी साचले आहे. यामुळे आयोजकांनी ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.