Mira Bhaynder News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : परप्रांतीयांकडून तिघांवर प्राणघातक हल्ला; दोन तरुण गंभीर जखमी

Mira Bhaynder News : राज्यात मराठी- अमराठी असा वाद सातत्याने उफाळून येत असतो. बऱ्याचदा मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशात भाईंदर मध्ये परप्रांतीयांकडून स्थानिक असलेल्या तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे

Rajesh Sonwane

मनोज तांबे 

भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सध्या पाहण्यास मिळत आहे. अशातच परप्रांतीयांकडून स्थानिक असलेल्या तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला करत मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर मारहाण करणारे दोन जण काशिमीरा पोलिसात जमा झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

भाईंदराच्या राई गावामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. राज्यात अगोदरच मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरु आहे. असे असता देखील अनेक ठिकाणी परप्रांतीयांकडून दादागिरी व मारहाण करण्याचे प्रकार समोर आले आहे. अशातच भाईंदरच्या राई गावामध्ये परप्रांतीयांकडून स्थानिक भूमीपुत्रावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

दोन तरुण गंभीर जखमी 

जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहेत. यातून रुपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील या स्थानिक असलेल्या तरुणांवर काही परप्रांतीयांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दोघेजण पोलिस ठाण्यात झाले हजर 
दरम्यान घटनेतील मारहाण करणारे दोन आरोपी काशिमीरा पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. तर उर्वरित आरोपी फरार आहेत. या आरोपींनी लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे. अन्यथा पुन्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरून परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन करेल; असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update : मुंबईला अखेर दुसरं विमानतळ मिळालं- पीएम नरेंद्र मोदी

GK: भारतातील पहिली मेट्रो सेवा कशी आणि कुठे सुरु झाली? जाणून घ्या

Maharashtra Politics : कोल्हापुरात शिंदे गटाला मोठा झटका! बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

Zubeen Garg Death Case: गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी चुलत भावाला पोलिसांनी केली अटक; मनं सुन्न करणारे खुलासे आले समोर

SCROLL FOR NEXT