Pimpri Chinchwad : रस्ता रुंदीकरणाच्या धोरणाला विरोध; माण ग्रामपंचायतीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धोरणा विरोधात ठराव

Pimpri Chinchwad News : आयटी पार्क मधील रस्ते रुंदीकरण करत असताना प्रशासन फक्त आयटी पार्क परिसरात काम करणाऱ्या अभियंताचेच म्हणणं विचारात घेतात आणि स्थानिक नागरिकांच्या हरकती धुडकावून लावत असल्याचा दावा
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांनी भल्या पहाटे दौरे करत, आयटी पार्क परिसरातील रस्ते रुंदीकरण करण्याचे कठोर निर्णय घेतले. मात्र अजित पवारांच्या निर्णया विरोधात आता माण ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी ठराव पारित केला आहे.

आयटी पार्क हिजवडी पाठोपाठ आता आयटी पार्क परिसरातील माण ग्रामपंचायत ने देखील उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या रस्ता रुंदीकरणाच्या धोरणाला कडाडून विरोध केला जात आहे. आयटी पार्क परिसरातील रस्ते रुंदीकरणाला विरोध नाही. मात्र आमच्या गावातील गावठाणाचे रस्ते हे फक्त २४ मीटर रुंद करण्यात यावे व गावठाणा बाहेरील रस्ते ३६ मीटर रुंदीचे करण्यात यावे; अशी मागणी माण ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी केली आहे. 

Pimpri Chinchwad
Majalgaon News : खोटे दस्तावेज तयार करून ५३ गुंठे प्लॉट हडपला; माजलगावच्या माजी नगराध्यक्षांवर शेतकऱ्यांचा आरोप

ग्रामस्थांवर केला जातोय अन्याय 

एकीकडे हिंजवडी फेज वन ते फेज थ्री असा ३६ मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. तर दुसरीकडे त्याच ३६ मीटर रुंदीच्या उड्डाण पुलाखालील रस्ता देखील ३६ मीटर रुंद करून राज्य सरकार आयटी पार्क परिसरातील ग्रामस्थांवर अन्याय करत आहे; असा दावा माण ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी केला आहे. तसेच केवळ अभियंत्यांचेच म्हणणे विचारात घेतले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.  

Pimpri Chinchwad
Buldhana Police : हातात कोयता घेऊन बनविली रील; सोशल मीडियावर व्हायरल होताच तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल

तर न्यायालयात दाद मागणार 

रस्ता रुंदीकरण करत असताना माण ग्रामपंचायत गावठाणातील मंदिर, शाळा, दुकान आणि नागरिकांचे घर बाधित होत आहेत. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांचा विचार प्रशासन जर करत नसेल तर शेवटी अजित पवारांच्या धोरणा विरोधात आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल अशा इशारा माण गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com