Bhayandar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Bhayandar Crime News: "हॅलो, मी डॉक्टरांची पत्नी बोलतेय..." महिलेचा आवाज काढून सोनाराला गंडवलं; असा अडकला जाळ्यात

Bhayandar Crime News: दागिने बनविण्याच्या बहाण्याने महिलेच्या आवाजात सोनाराला फोन केला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Bhayandar Crime News: दागिने बनविण्याच्या बहाण्याने महिलेच्या आवाजात सोनाराला फोन केला. बांगड्या बनवण्याची खोटी ऑर्डर देत ४ लाख रुपयांचे सुट्टे पैसे देखील हवे आहेत, असं म्हणत त्याने सोनाराला एका रुग्णालयाजवळ बोलावलं. त्यानंतर बांगड्यांचे माप घेण्यासाठी सोनाराने पाठवलेल्या माणसाच्या हातातून पैसे घेऊन त्याने पोबारा केला. (Breaking Marathi News)

बांगड्यांची ऑर्डर व सुट्टे पैसेच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनाराने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत ३ दिवसांत आरोपीसह त्याच्या मित्राला अटक केली. अगदी चित्रपटाचा कथेलाही लाजवेल, अशी ही धक्कादायक घटना मीरा-भाईंदरमध्ये घडली.

मनीष अंबेकर आणि त्याच्या जोडीदार अन्वर अली शेख, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वला नवघर रोडवर असणाऱ्या श्री राम ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात एका अनोळखी महिलेने फोन केला. (Latest Marathi News)

मी डॉक्टर कदम यांची बायको बोलत असून मला ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या बनवायच्या आहेत. तसेच ४ लाख रुपयांचे सुट्टे देखील हवे आहेत, असं सांगितलं. तुमच्या माणसाला आशिर्वाद हॉस्पिटलजवळ पाठवून द्या, मी तिथेच आहे, असं देखील ही महिला म्हणाली.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे सोनाराने आपल्या विश्वासू माणसाला बांगड्यांचे माप घेण्यासाठी पाठवले. त्याचबरोबर सोबत दोन लाख रुपयांचे सुट्टे पैसे म्हणजेच ५०० च्या नोटा पाठवल्या. सोनाराचा माणून हा माप घेण्यासाठी आला असता, आरोपीने त्याच्या हातातून पैशांची बँग हिसकावून पळ काढला.

बांगड्यांची ऑर्डर व सुट्टे पैसेच्या नावाखाली सोनाराची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकान मालकाने नवघर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरुद्ध कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच नवघर पोलिसांनी (Police) 2 दिवसातच आरोपीचा शोध घेतला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

SCROLL FOR NEXT