Raj Thackeray News, Bhaskar Jadhav latest Marathi news, Bhaskar Jadhav News, MNS News Saam TV
महाराष्ट्र

राज ठाकरेंना गांभीर्याने घ्या; शिवसेना नेत्याचे 'मविआ' कार्यकर्त्यांना आवाहन

एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याने ते राज ठाकरेंच्या विराेधात बाेलत नाहीत.

अमोल कलये

रत्नागिरी : राज ठाकरे यांचे पुण्यातील (pune) भाषण हे महाविकास आघाडीतील (mva) सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे मत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार भास्कर जाधव (mla bhaskar jadhav) यांनी येथे (ratnagiri) व्यक्त केले आहे. आमदार जाधव यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांचे भाषण कोणीही चेष्टेचा विषय करू नये असे आवाहन देखील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना केले आहे. (Bhaskar Jadhav latest Marathi news)

आमदार भास्कर जाधव म्हणाले राज ठाकरे यांना हिणवण्याकरता या भाषणाकडे काेणीही बघितले नाही पाहिजे. त्यांचे भाषण राजकीयदृष्ट्या प्रगल्भतेने आणि राजकीयदृष्ट्या अतिशय वैचारीक पद्धतीने घेण्याची गरज आहे.

आमदार भास्कर जाधव म्हणाले भाजपचे दाखवयाचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे राज ठाकरे यांनी वेळीस समजले आहे. एमआयएम (mim) ही भाजपची (bjp) बी टीम आहे. मुस्लिम समाजाने ठाकरेंच्या भाषणावर काेणीही टीका टिप्पणी करुन नका असे एमआयएमचे नेते सांगतात. हीच तर खरी मेक आहे. दरम्यान परिपक्व राजकीय भाषण म्हणून राज ठाकरेंच्या भाषणाकडे पाहण्याची आवश्यकता असल्याचे आमदार जाधव यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT