- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी (mva) दिलेली वचन पाळत नसल्याच्या कारणास्तव आज (शुक्रवार) सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठकीवर आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्यासह भाजपने बहिष्कार घेतला आहे. दूसरीकडे भाजपचा बैठकीवरील बहिष्कार म्हणजे नाैटंकी असल्याची टीका खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केली आहे. (sindhudurg latest marathi news)
आमदार नितेश राणे म्हणाले बैठकीत जाऊन केवळ बदाम आणि चहा प्यायला जाऊ का. इथे जिल्ह्यातील सर्व काम ठप्प झाली आहेत. जिल्हा परिषदेचे परत गेलेले ६५ कोटी रुपये परत देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आश्वासन दिले होते. हे पैसे का नाही दिले परत असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
दरम्यान जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीवर भाजपने घातलेला बहिष्कार म्हणजे ड्रामेबाजी आहे. पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा चांगला विकास हाेत आहे. सर्व पक्षांना एकत्र घेऊन काम केले जात आहे. चांगल्या कामात अपशकुन करण्याचे काम राणे पुरस्कृत भाजप करीत आहे. ही सगळी राणेंची नौटंकी आहे असे मत खासदार विनायक राऊत यांनी भाजपने आजच्या बैठकीवर घातलेल्या बहिष्कारवर व्यक्त केले.
दरम्यान तब्बल पाच महिन्यानंतर होत असलेल्या जिल्हा नियोजन बैठकीवर भाजपने बहिष्कार घातल्याने आणि मविआने एकजूटीने बैठक सुरु केल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे दिसून आले. खरंतर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनची बैठक दर वेळी वादळी होत असते हा इतिहास आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.