Bharat Gogawale Saam TV
महाराष्ट्र

ST bus : कुर्ला बस अपघतानंतर एसटी महामंडळ अॅक्शन मोडवर, भरत गोगावलेंनी सांगितली सुरक्षा त्रिसूत्री!

ST bus : भाडेतत्त्वावरील बसच्या समावेशाला विलंब होत असल्याने भाडेत्त्वावरील एसटी बस करार रद्द करा, अशा सूचना यावेळी गोगावले यांनी दिल्या.

Namdeo Kumbhar

Bharatshet Gogawale News : सोमवारी कुर्ल्यात घडलेला बेस्ट बसचा अपघात आणि भंडारा, नाशिक येथे झालेल्या एसटीच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्याकडून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला माधव कुसेकर आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अपघातांमध्ये होणारी वाढ आणि बस पुरवण्यास होणारा विलंब या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण होती. या बैठकीत भरत गोगावले यांन त्रिसूतीवर वक्तव्य केला. ५५ लाख एसटी प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी अपघात कमी करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब केला जाईल, असे भरत गोगावले म्हणाले.

भाडेतत्त्वावरील बसच्या समावेशाला विलंब होत असल्याने भाडेत्त्वावरील एसटी बस करार रद्द करा, अशा सूचना यावेळी गोगावले यांनी दिल्या. सध्या एसटी महामंडळाकडे १४००० बसेस आहे. त्या अपुऱ्या पडत आहे. त्यापैकी अनेक बसेस जुन्या आहेत. त्यामुळे नव्या बसेस लवकर येणं अपेक्षित होतं. पण विलंब झाला. त्यामुळे भरत गोगावले यांनी नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. दरम्यान खासगी बस पुरवठादाराकडून पुरवण्यात आलेल्या बसचा बेस्ट मध्ये झालेला गंभीर अपघात, या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी काही सूचना दिल्या.

त्रिसूत्री कोणती? त्यात नेमकं काय?

चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी

मानसिक आरोग्य

तांत्रिकदृष्ट्य निर्दोष वाहन उपलब्धता

गोगावले काय म्हणाले ?

यांत्रिक बिघाड नसलेली सुस्थितीतील बस आणि त्यावरचा चालक या दोघांचीही स्थिती अत्यंत निरोगी असणे गरजेचे आहे.

बसचा चालक योग्य प्रकारे प्रशिक्षित तर असला पाहिजेच. परंतु त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती देखील बस चालवण्यासाठी सक्षम असली पाहिजे. यामध्ये त्यांनी किती वेळ ड्युटी केली आहे, तो कोणत्या तणावात आहे का? त्याचा स्वभाव कसा आहे? त्याची झोप पुरेशी झाली आहे का? हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या बसेस यावर जनतेचा विश्वास आहे. अपघात हा शेवटी अपघात असतो. तो कोणी मुद्दाम करत नाही. हे जरी खरं असलं तरी देखील यामध्ये काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणूनच एका अपघातामध्ये तू ड्रायव्हर बाद आहे, त्याला पुन्हा वापरू नका? असे आम्ही म्हणत नाही. परंतु चूक सुधारण्यास वाव दिला तर ती चूक सुधारू शकेल अशी व्यक्तीच तुम्ही नेमली पाहिजे. केवळ 20 20 तास, पंधरा-पंधरा तास काम करायला तयार आहेत, म्हणून कमी पैशात मिळणारी माणसं ड्रायव्हर म्हणून वापरणे योग्य नाही. आपल्याला माणसांकडून काम करून घ्यायचे आहे केवळ यंत्रांकडून नाही हे समजून घेतलं पाहिजे.

गाडीला स्पीड लिमिट करण्यासाठी स्पीड लॉक असला पाहिजे. त्याचा नीट वापर केला पाहिजे. आजकाल व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम सुद्धा असते, ती असली पाहिजे. गाडीमध्ये सीसीटीव्ही चालू स्थितीत जर असतील तर ह्या अशा घटनांवर प्रतिबंध करता येऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT