CM Devendra fadnavis  Saam
महाराष्ट्र

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. कुणाकुणाला संधी देण्यात आली वाचा संपूर्ण यादी....

Priya More

Summary -

  • भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा

  • विधान परिषदेसाठी १० जागांची निवडणूक

  • प्रज्ञा सातव यांचे नाव निश्चित

  • इतर ५ उमेदवारांचीही घोषणा

  • राज्यात राजकीय हालचाली वेगात

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने ६ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. भाजपच्या वाट्याला १० पैकी ६ जागा आहेत. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाले होते. तर इतर ५ जणांच्या नावांवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला.

भाजपकडूनसर्व उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून ५ जणांची नाव फायनल करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील ९ सदस्यांची मुदत येत्या १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये संजय केणेकर, नीलम गोन्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या ९ सदस्यांचा समावेश आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी देखील निवडणूक होणार आहे. या १० जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

भाजपने कुणाला दिली उमेदवारी -

सुनील विनायक कर्जतकर

माधवी नाईक

संजय नत्थूजी भेंडे

विवेक बिपिनदादा कोल्हे

प्रमोद शांताराम जठार

प्रज्ञा सातव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Batatyache Dhirde Recipe: खमंग आणि चविष्ट नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा बटाट्याचे धिरडे, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

SCROLL FOR NEXT