Bharati Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Bharati Pawar Passed away : भारती पवार यांचं निधन, सामाजिक क्षेत्रात हळहळ; पुण्यात उद्या अंत्यसंस्कार

Bharati Pawar death : भारती पवार यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Vishal Gangurde

पुणे : भारती प्रतापराव पवार (वय ७७) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. तसेच ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या त्या मातोश्री होत. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

भारती पवार या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर २२ ऑगस्ट १९७० रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे पुण्यात पुण्यात आल्यावर ‘सकाळ’च्या माध्यमातून त्या अनेक उपक्रमांत सहभागी होत. औंधजवळील बालकल्याण संस्थेमध्ये त्या सुमारे ३५ वर्षे सक्रिय होत्या. तेथे त्या विश्वस्तही होत्या. बालकल्याण संस्थेतील प्रत्येक उपक्रमात त्या सहभागी होत. अनेक मुला-मुलींना त्यांनी तेथे चित्रकलेचे धडे दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच ‘सकाळ’ संचलित कोरेगाव पार्क आणि कोथरूड येथील अंधशाळेतही त्या विश्वस्त होत्या. तेथील अनेक उपक्रमांत त्या सहभागी होत.

भारती पवार यांच्या मागे सून मृणाल अभिजित पवार, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच कन्या अश्विनी, नातू झाकिर असा परिवार आहे. भारती पवार यांना ‘एक्स’वरून श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘भारती पवार यांनी बालकल्याण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतला. चित्रकलेच्या क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे म्हटले.

तर पवार कुटुंबाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे आदींनीही भारती पवार यांना ‘एक्स’वरून श्रद्धांजली अर्पण केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचं थोड्या वेळापूर्वी निधन झालं. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केलं आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खूप प्रेम केलं. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील. काकी, भावपूर्ण श्रद्धांजली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

Maharashtra Live News Update: भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

DVT symptoms: जास्त वेळ बसणं आणि धूम्रपानामुळे रक्ताच्या गाठींचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT