Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: saam tv
महाराष्ट्र

Mahatma Phule: विधानसभेत महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव मंजूर

Bharat Ratna To Mahatma Jyotiba Phule And Savitribai Phule: विधानसभेत महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा असा ठराव मांडण्यात आला.

Bharat Jadhav

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारला विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरून कोंडीत पकडलं. विविध प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर आरोप टीका- टीप्पपणी केली. पण महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना भारतरत्न देण्याचा ठरावाला विरोधक आणि सरकारमधील आमदारांनी एकमताने ठराव मंजूर केला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना रणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी शिफारस केंद्राला सरकारकडे करण्यात यावी, असा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला. जयकुमार रावल यांनी मांडलेला ठरावाला छगन भुजबळ यांनी दर्शवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

या ठरावावर बोलताना अजित पवार म्हणाले, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना देशाचा सर्वाच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय. हा ठराव पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा आहे. संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर करणाऱ्या सर्व विधीमंडळातील सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले.

दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा आणली

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली होती. त्यांच्या त्या कामामुळे आज स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली झाली. शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर आहेत. महिला देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत.

याचे श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला, घेतलेल्या कष्टाला आहेत. दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचं कार्य या दांपत्याने केलं हे कार्य अलौकिक आहे. शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी फुले दाम्पत्य हे कायम ‘महात्मा’ राहणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT