नितेश राणे आणि निलेश राणे यांना काहीतरी बोलल्या शिवाय करमत नाही. निकाल लागला नाही तोवर त्यांनी दावा करणे चुकीचं आहे. भाजपमध्ये अनेक ठिकाणी उलटसुलट घडामोडी झाल्यात त्या आम्ही सांगायच्या का, तिथं आम्ही दावे करायचे का अशी आक्रमक भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केला आहे.
नितेश आणि निलेश राणे यांनी टवीट करून उदय सामंत यांच्या रत्नागिरी बरोबरच राजापूर मतदारसंघावर दावा केला आहे. त्यावर आमदार भरत गाेगावले हे आक्रमक झाले आहेत. दोघा राणे बंधूंच्या दाव्यांना वरती (श्रेष्ठी) कुणी विचारणार नाही. हा माझा तुम्हांला शब्द आहे.
आमदार भरत गोगावले पुढं बाेलताना म्हणाले आम्हांला विधान परीषदेच्या पदवीधर जागेचा विचार करावा करावा लागेल. एकतर त्यांना तिकीट मिळताना अडचण झाली होती. मुख्यमंत्र्यांनी किरण सामंतांची समजूत काढली म्हणून त्यांना एवढी मते मिळाली. राणे बंधूनी सांभाळून बोलावे असा सूचक इशारा गोगावले यांनी दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.