Bhandara Lakhandur Road Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident : दारू पिऊन ट्रॅक्टर घेऊन निघाला, निलेशचा ताबा सुटला, ४ वर्षाच्या पुतण्याचा जागीच मृत्यू

Bhandara Lakhandur Road Accident News : भंडाऱ्यातील लाखांदूर शहरात आज सकाळी मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने चुकीच्या दिशेने भरधाव वाहन चालवल्याने डिव्हायडरला भीषण धडक दिली. अपघातात चार वर्षीय दक्ष अवसरे याला गंभीर इंटरनल हेड इंज्युरी झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • लाखांदूरमध्ये ट्रॅक्टरची डिव्हायडरला धडक

  • चालक दारूच्या नशेत व विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आला

  • 4 वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

  • नागरिकांमध्ये संताप

शुभम देशमुख, भंडारा

एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या बेदरकारपणामुळे अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना लाखांदूर शहरात घडली आहे. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा स्वतःचा पुतण्या ठार झाला असून, परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास लाखांदूर शहरात ही थरारक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेला ट्रॅक्टर चालक निलेश अवसरे हा ट्रॅक्टर घेऊन विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जात होता. ट्रॅक्टरचा वेग इतका जास्त होता की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, डिव्हायडरवरील लोखंडी कठडे अक्षरशः चिरडले गेले.

धडकेच्या जोरामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली निकामी होऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये बसलेला चार वर्षीय चिमुकला दक्ष अवसरे हा गंभीररित्या बाहेर फेकला गेला. या अपघातात दक्ष याला गंभीर स्वरूपाची इंटरनल हेड इंजुरी झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, ट्रॅक्टर चालक निलेश अवसरे हा देखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सकाळच्या वेळी घडलेल्या या भीषण अपघातामुळे लाखांदूर शहरात खळबळ उडाली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून निष्पापांचा जीव घेणाऱ्या अशा बेजबाबदार चालकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेषतः विरुद्ध दिशेने येणाऱ्या आणि वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर आळा घालण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bihar Bhavan: मुंबईत उभारणार बिहार भवन; ३० मजली इमारत बांधणार, खर्च ३१४ कोटी; मनसेचा विरोध | VIDEO

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

SCROLL FOR NEXT