Bhandara Sarpanch and Police Patil
Bhandara Sarpanch and Police Patil Saam TV
महाराष्ट्र

ना-हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांची लाच; सरपंच, पोलीस पाटील, अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अभिजित घोरमारे

भंडारा : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी मुदतवाढ दिल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) ना-हरकत प्रमाणपत्रासाठी सरपंच आणि पोलीस पाटील पैशांची मागणी करत होते. सदरील तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत (LCB) प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. सरपंच (Sarpanch) आणि पोलीस पाटलाला (Pilice Patil) 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदरील प्रकार भंडारा तालुक्यातील नवरगाव येथून उघडकीस आला आहे. (Bhandara Crime News)

सरपंच रवींद्र कवडू आजबले (वय 42), पोलीस पाटील रामकृष्ण धर्माजी आजबले (वय 53) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील नवरगाव येथे तक्रारदार व्यक्तीची गौण खाण आहे. खाण चालवण्यासाठी तक्रारदाराने खनिकर्म अधिकाऱ्यांकडून कायदेशीररित्या 1 वर्षाची मुदतवाढ घेतली.

तक्रारदाराने कायदेशीररित्या परवानगी घेऊन सुद्धा ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही, अशी धमकी सरपंच रवींद्र आजबले व पोलीस पाटील रामकृष्ण आजबले यांनी तक्रारदाराला दिली. तसेच ना-हरकत प्रमाणपत्र हवे असल्यास 60 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली.

दरम्यान, तक्रारदाराने सदरील माहिती भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. तक्रार दाखल होताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी (3 मे) सायंकाळी नवरगाव येथे सापळा रचला. तसेच सरपंच रवींद्र आजबले आणि पोलीस पाटील रामकृष्ण आजबले यांना 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

दरम्यान, दोघांनाही लाचलुचपत पथकाने ताब्यात घेण्यात आले असून आता लोकसेवेकच भष्ट्राचाराच्या यादीत आल्याने सामान्याचे प्रश्न कोण सोडविणार हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

SCROLL FOR NEXT