Bhandara Crime News 
महाराष्ट्र

व्यापा-यास 22 लाखांना लुटणारी टाेळी अटकेत; ५ ट्रक मालकाचे कृत्य

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या पसळगाव- गोंडउमरी मार्गावर डोळ्यात मिर्चीपावडर टाकून वाटमारी करत तेलंगणा राज्याच्या व्यापाराचे 22 लाख 50 हजार रुपये लुटणाऱ्या आठ संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 12 तासात अटक केली. यात घटनेच्या दिवशी पैसे घेऊन येत असलेला वाहन चालकच गुन्हाचा मास्टर मांइड निघाला.अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये रामदास भिरकड (वय 40) हा मुख्य संशियत समजला जात आहे. याबराेबरच देवेंद्र सोनटक्के, चेतन शिवनकर (वय 25) ,प्रकाश चिंचोळकर (वय24) ,आशीष कळपाते (वय 25) , संजय राणे (वय 25) , रेकराम सोनटक्के (वय 34) , शशिकुमार सोनटक्के (वय 34) यांचा समावेश आहे. (bhandara-police-arrested-eight-youths-crime-news)

घटनेच्या दिवशी धान व्यापारी रमेश अन्ना यांच्या धान व्यवहाराचे 22 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर व वाहन चालक रामदास भिरकड हे गोंदिया येथून तेलंगणाकड़े निघाले होते. दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातीलल पसळगाव- गोंडउमरी मार्गावर तीन दुचाकीस्वार आलेल्या 7 अज्ञातांनी दिवाणजीच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून वाहन चालकास चाकूचा धाक दाखवत वाटमारी करून 22 लाख 50 हजार घेऊन गेले. या प्रकाराची तक्रार Bhandara Crime News साकोली पोलिसात दाखल होताच घटनेचे गांभीर्य लक्षात जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव vasant jadhav यांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या local crime branch पथकाला दिला.

पोलिसांना चाैकशी अंती दिवाणजी व चालकावर संशय आला. त्यांनी त्यांची उलट तपासणी घेतली. त्यावेळी वाहन चालकावर संशय जास्त बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने धान व्यापऱ्यांने 10 लाख रुपये थकविल्याने राग मनात धरून आपल्या इतर मित्रासह हा गुन्हा केल्याचे कबूल केले.

संशयितांच्या मेव्हण्याकडून चाेरीची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संशियताकडे स्वतःचे पाच ट्रक आहे. तरी त्याने हे कृत्य केले. मुख्य संशयितास न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी बजावली आहे. अन्य सात जणांना न्यायालयीन कोठड़ीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT