

सिंधुदुर्ग : कोवीडच्या काळात सिंधुदुर्गातील लोक कलाकार फारच अडचणीत आले आहेत. त्यांना शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी कणकवली येथील लोक कलाकारांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली. कोकणातील लोक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून आज (गुरुवार) कणकवली पंचायत समिती कार्यालयात त्यांनी बैठक घेऊन प्रांताधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने प्रांताधिका-यांना यंदाच्या गणेशाेत्सवात विशेषत: गणेश चतुर्थीला कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. पंधरा दिवसात यावर निर्णय झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक कलाकार रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
अध्यात्मिक समन्वय आघाडी कणकवलीचे अध्यक्ष प्रकाश पारकर म्हणाले sindhudurg काेकणातील लाेककलाकरांचे खाण्या पिण्याचे हाल झालेले आहेत. गेली दाेन वर्ष कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांच्या हाती काहीच नाही. शासनाने लाेक कलाकरांना मदत देणे आवश्यक हाेते मात्र अद्याप काेणतीच मदत दिलेली नाही. भजन, दशावतार, मृदुंगवाले, वाद्यवृंदवाले, किर्तनाकर, गझलकार, गाेंधळी नृत्यू कलाकार, नमन कलाकार, फुगडी कलाकार, शक्तीतूरा आदी कलाकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व कला काेकणची संसकृती आहे. त्यांची सेवा बंद झालेली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.