Tiger Attack Saam tv
महाराष्ट्र

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; घटनेनेनंतर वनविभागाच्या वाहनाची तोडफोड करत पेटविले

Bhandara News : वाघाने हल्ला करत ठार केल्यानंतर वाघाने यांच्या मृतदेहाजवळ ठाण मांडला होता. ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ तेथून गेला नाही.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा परिसरात वाघानं हल्ला केल्याने यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर भंडार्याच्या कवलेवाडा परिसरात नागरिक संतप्त झाले होते. यामुळे परिसरात हिंसक वळण आले होते. यावेळी नागरिकांनी वनविभागाच्या गाड्यांची तोडफोड करत वाहन पेटवून दिली होती. 

भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा येथील नंदा किसन खंडाते (वय ५०) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे. दरम्यान वाघाने हल्ला करत ठार केल्यानंतर वाघाने यांच्या मृतदेहाजवळ ठाण मांडला होता. ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ तेथून गेला नाही. अखेर वाघांने महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडल्यानं याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली. 

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न 

मात्र, वन विभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले नाही; असा आरोप करीत शेकडोंच्या संख्येतील संतप्त ग्रामवासीयांनी घटनास्थळावर पोहोचलेल्या १० ते १५ वन कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा रोष बघता वन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवत सैरावरा पळाले. यानंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिलं. 

नागरिकांचा घटनास्थळी ठिय्या 

रात्री उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून त्याला जेरबंद केलं. यावेळी संतप्त ग्रामवासीयांनी महिलेचा मृतदेह जेरबंद केलेल्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर ठेवत मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी या मागणीला घेऊन आंदोलन केलं. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि खासदार प्रशांत पडोळे यांनी नागरिकांची समजूत काढत रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आणि जेरबंद केलेल्या वाघावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी नेण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT