Prakash Ambedkar News Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: महाविकास आघाडीत नेमका किती जागांवरून वाद? प्रकाश आंबेडकरांनी सगळंच सांगितलं...

Maha Vikas Aghadi News: आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार असल्याची चर्चा आहे

Satish Daud

Maha Vikas Aghadi Prakash Ambedkar News

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, अद्यापही जागावाटपाबाबत तिढा सुटलेला नाही. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या ४ दिवसांपासून वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर बातमी चाललेली आहे की वंचित बहुजन आघाडी किती जागा मागत आहे. आमची अजूनही महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते भंडारा येथे बोलत होते.

महाविकास आघाडीत आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात १५ जागांसाठी भांडणे सुरू आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. "त्यांचा जागावाटपाचा तिढा सुटला, की आम्ही वंचित बहुजन आघाडीसाठी जागांची मागणी करू. (Latest Marathi News)

आम्ही अजूनही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "भंडारा जिल्ह्यात जेव्हा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला होता. त्यावेळी अजित पवार जलसंपदा मंत्री होते".

"याबाबत नागपूर कोर्टात याचिका देखील दाखल झाले होती. असे आरोप झालेल्या अजित पवारांसोबत भाजपने सत्ता स्थापन केली. शासनामध्ये बसलेला RRS बीजेपी यांना सत्तेमधून उतरावं लागेल आणि त्यांना उतरवल्या शिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही", अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण, पूजा गायकवाडला 3 दिवसाची पोलीस कोठडी

लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण; तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात खासदार निंबाळकर आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Viral : घोर कलयुग! मंदिरात नाचवली रशियन तरुणी, Video पाहून लोक संतापले

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला संधी, कुणाला मिळाला डच्चू? IND vs UAE सामन्यात अशी आहे टीम इंडियाची Playing XI

राज - उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी काय? बघा VIDEO

SCROLL FOR NEXT