Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara : ऊस देऊन सहा महिने उलटले; चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक, कार्यालयाला लावले कुलूप

Bhandara News : शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर ४५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना उसाचे चुकारे देणे बंधनकारक आहे. परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यात आले नाही

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: साकोली झोनमधील साकोली, एकोडी, सानगडी येथील शेतकऱ्यांनी देव्हाडा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्री या साखर कारखान्यामध्ये ऊस देऊन सहा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यांना उसाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून आज आंदोलन करत मानस ऍग्रो इंडस्ट्रीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गावोगावाहून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी देव्हाडा येथील मानस ऍग्रो इंडस्ट्री साखर कारखान्याला ऊस विक्री केला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर ४५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण उसाचे चुकारे देणे हे बंधनकारक आहे. परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना अजूनही उसाचे पैसे देण्यात आले नाही. या दरम्यान अनेकदा पैशांची मागणी देखील केली.

शेतकऱ्यांकडून १५ दिवसांचा अल्टिमेटम 

साखर कारखान्याने सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील उसाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. चुकारे मिळावे या मागणीसाठी साकोली येथे मानस कार्यालयावर आंदोलन केले. पंधरा दिवसाच्या आत चुकारे न मिळाल्यास पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी त्वरित उसाची चुकारे मिळावे यासाठी मुख्य कार्यकारी व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे 

तर साखर कारखान्यावर भव्य मोर्चा 

सुमारे सत्तर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी साकोली येथील मानस ऍग्रो इंडस्ट्रीच्या कार्यालयावर आंदोलन करून कार्यालयाला कुलूप लावले आहे. साकोली झोन प्रभारी मुकेश वाडी भस्मे यांनी त्वरित चुकारे देण्याचे आश्वासन दिल्याने कुलूप उघडण्यात आले. तर २५ मे पर्यंत संपूर्ण उसाचे चुकारे १५ टक्के व्याजासकट शेतकऱ्यांना द्यावे; अन्यथा साकोली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी २७ मेस देव्हाडा येथील ऊस कारखान्यावर भव्य मोर्चा काढतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळला डॉक्टरांचा मृतदेह, हत्या की आत्महत्या? बीडमध्ये खळबळ

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांची मासे खरेदीसाठी बाजारात गर्दी

Sangli : मानाचा नारळ ४१ हजार रुपये, कोथिंबीर जुडी २० हजारात खरेदी; महाप्रसादातील वस्तूंचा लिलाव

Akshay Kumar : गणपती विसर्जनानंतर अक्षय कुमार पोहचला जुहू बीचवर; हातात ग्लोव्हज घालून उचलला कचरा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT