Bhandara News SSC Exam Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: वडिलांचा मृतदेह घरात..डोळ्यात आसू साठवून त्‍याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर

वडिलांचा मृतदेह घरात..डोळ्यात आसू साठवून त्‍याने धैर्याने सोडविला दहावीचा पेपर

अभिजीत घोरमारे

भंडारा : दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू सध्‍या सुरू आहे. पेपर सुरू असतानाच वडिलांचा अचानक मृत्यू (Death) झाला. नेमका त्या दिवशी भूमितीचा पेपर होता. एकीकडे वडिलांच्या जाण्याचे अपार दुःख अन् दुसरीकडे बोर्डाची परीक्षा! तरी (Bhandara News) मनावर दुःखाचा डोंगर ठेवून डोळ्यात आसू साठवून त्‍याने धैर्याने पेपर सोडविला. यानंतर त्‍याने वडीलांच्‍या पार्थिवाला अग्‍नीडाग दिला. (Breaking Marathi News)

भंडारा जिल्‍ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे १५ मार्चला ही घटना घडली आहे. येथील भाष्कर पांडुरंग तुपटे (वय ४२) यांची मागील चार-पाच दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी डॉक्टरांच्या मदतीने उपचारही केले. मात्र बुधवारी अचानकपणे सकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा 16 वर्षीय मुलगा ओमकार शिवाजी विद्यालयात शिकतो. त्याचा सकाळी ११ वाजता दहावीच्या भूमितीचा (गणित -२) पेपर होता. एकीकडे पितृवियोग अन् दुसरीकडे परीक्षा! अखेर दुःख बाजुला सारून त्याने परीक्षा (SSC Exam) देण्याचा निर्णय घेतला.

पेपर देवून वडीलांना दिला अग्‍नीडाग

डोळ्यात आसवांचा पूर घेऊन खिन्नपणे बसलेल्या मुलाला कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी हिंमत दिली. घडले ते आपल्या हातात नाही, परीक्षा दे, ही संधी सोडू नको, असे समजावले. गावापासून १२ किलोमीटर अंतरावरील लाखांदूरच्या शिवाजी विद्यालयातील परीक्षा केंद्र गाठले. डोळ्यातील आसवांना बांध घालून पेपर सोडविला. घरी परतल्यावर कुटुंबीय, नातलग व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत वडिलांच्या चितेला भडाग्नी देऊन मुलाचे कर्तव्य पार पाडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT