Bhandara news Saam tv
महाराष्ट्र

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर चालविला ट्रॅक्टर, पोलीस कर्मचारी गंभीर

Bhandara news : वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैधपणे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत होती. यावर कारवाई करण्याकरिता कारदा पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी पोहचले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वाळू माफियांची मुजोरी थांबण्याचे नाव घेत नाही. चोरून वाळू तस्करी करत असून देखील प्रशासनावर मुजोर होऊन वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. अशीच घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली असून कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालविल्याची घटना भंडाऱ्याच्या खमारी बुटी येथे घडली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. 

वाळू वाहतुकीस बंदी घालण्यात आली असताना देखील वाळू माफियाकडून नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात आहे. अशाच प्रकारे वाळूचं होतं असलेलं उत्खनन आणि त्याची वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता गेलेल्या पोलिसांच्या पथकावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून त्यात एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची घटना भंडाऱ्याच्या खमारी बुटी या ठिकाणी घडली आहे. 

कारदा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी बुटी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचं अवैधपणे उत्खनन करून त्याची वाहतूक करण्यात येत होती. यावर कारवाई करण्याकरिता कारदा पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी पोहचले. पोलिसांना पाहून वाळू माफिया ट्रॅक्टरसह चालकांनी सैरावैरा पडत सुटले. त्यातील एका ट्रॅक्टर चालताना कारवाईच्या भीतीपोटी थेट त्याचा ट्रॅक्टर पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चालविला. 

पोलीस कर्मचारी गंभीर जखमी 

या सर्व प्रकारात अर्धा पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असलेले त्र्यंबक गायधने (वय ४४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडाराच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारवाईत कर्दा पोलिसांनी १५ ट्रॅक्टर जप्त केले असून पुन्हा पोलिसावर प्राणघातक हल्ला करणे आणि वाळूची अवैध चोरी करणे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Local Body Election : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, देशमुख कुटुंब शिंदेंच्या शिवसेनेत

Black Tea: थकवा घालवायचाय? रोज सकाळी प्या ब्लॅक टी, शरीराला मिळतील अनेक फायदे

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ६ नोव्हेंबरपासून धावणार | VIDEO

Local Body Election : युती नकोच! राज ठाकरेंना काँग्रेसचा जोरदार धक्का, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT