Bhandara Accident News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News : लग्नासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू

Bhandara Accident News : या भीषण अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टर सुफल गजभिये (वय ५२) आणि आई कांता गजभिये (वय अंदाजे ८५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

Satish Daud

शुभम देशमुख, साम टीव्ही भंडारा

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाणपुलावर शनिवारी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. लग्नासाठी रायपूरवरून नागपूरच्या दिशेने कारने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकली.

या भीषण अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टर सुफल गजभिये (वय ५२) आणि आई कांता गजभिये (वय अंदाजे ८५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात शिवान सुफल गजभिये (वय १४) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनं परिसरातून हळहळ होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर सुफल गजभिये हे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी कुटुंबासहित कारने रायपूर येथून नागपूरच्या दिशेने जात होते. साकोली उड्डाणपुलावर काही वेळापूर्वी रिमझिम पावसामुळे पाणी साचल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

कारचा वेग अधिक असल्याने कार स्लीप होऊन दुभाजकावर जोराने धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारमध्ये असलेल्या डॉक्टर सुफल गजभिये यांच्या आई कांता गजभिये (वय अंदाजे ८५ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

अपघाताची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टर सुफल गजभिये (वय ५२) यांचा मृत्यू झाला. सध्या शिवान सुफल गजभिये (वय १४) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT