Bhandara Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Rain Alert : भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील ४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टी. हवामान विभागाकडून जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे. यातच हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळपासून देखील जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

राज्यात सर्वत्र जोरदार पावसाने झोडपूर काढले आहे. अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर हवामान विभागाकडून जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

शाळांना दोन दिवस सुटी जाहीर 

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील ४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात काही भागात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. 

मुसळधार पावसानं भंडाऱ्यातील २५ मार्ग बंद
जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून जिल्ह्यातील २५ मार्गावरून पावसाचं पाणी वाहतं असल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सातत्यानं पाऊस पडत असल्यानं नदीनाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी, अनेक गावातील सखल भागात पावसाचं पाणी घरांमध्ये शिरायला लागले असून अनेक घरात पाणी शिरायला लागल्यानं जीवनोपयोगी साहित्यसह महत्त्वाच्या वस्तूसह अनेक कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT