शुभम देशमुख
भंडारा : देवेंद्र फडणवीसचीचं कीव येतेय. आमची मागणी आहे, कि नियम सगळ्यांसाठी सारखा आहे. तर अमित शहा, नरेंद्र मोदी आणि योगी यांच्याही हेलिकॉप्टर उतरल्यानंतर बॅगची तपासणी व्हायला पाहिजे. नियम सगळ्यांसाठी सारखा असेल तर त्यांच्या बॅग का तपासल्या जात नाही?; असं म्हणून हेलिकॉप्टरमधील बॅग तपासणीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तत्तर दिले आहे.
मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमध्ये ज्या बॅग दिसत होत्या. त्या बॅगा कशाच्या होत्या? म्हणूनच हेतू पुरस्सर विरोधकांना टार्गेट करायचं प्रयत्न सत्तेच्या जोरावर भाजप करीत असेल तर या पद्धतीची भूमिका मांडणे चुकीची आहे. असे म्हणत (Devendra Fadanvis) देवेंद्र फडणवीसचीचं कीव येते. खऱ्या अर्थाने यांच्यावर आम्हाला काँग्रेसला जायचं नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, बेरोजगारी आणि महागाई हे तीन मुद्दे काँग्रेसचे आहेत. असेही पटोले (Nana Patole) म्हणाले.
ओबीसी समाजवाल्यांना भाजपवाले कुत्र म्हणतात. हा ओबीसी समाजाचा माणूस असून भाजपची वकिली करत असेल तर त्या बावनकुळीची कीव येते. खरंतर लाथ मारली पाहिजेल त्या भाजपला आणि ओबीसीच्या सर्व नेत्यांनी भाजपमधून बाहेर पडलं पाहिजे. परंतु, ओबीसींना कुत्रं म्हणणारा भाजपमध्ये ओबीसीचे नेते म्हणून मिरविणाऱ्या लोकांबद्दल कीव येत आहे. म्हणून बावनकुळेंनी हे सर्व राजकारण सोडावं. देशाचे प्रधानमंत्री हे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणत असतील, मग ओबीसी समाजाला कुत्रं म्हणत असतील तर नरेंद्र मोदीच्या बाबतीतही भाजपवाले हेच भूमिका बोलू शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.