भंडारा : भंडारा जिल्ह्यात एक अत्यंत हृदयद्रावर घटना घडली आहे. येथे एका आईने आपल्या दोन मुलांसह विष प्राशन (Poison) करुन आम्तहत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. या घटनेत एका 14 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर मुलीवर आणि आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. - Bhandara News Mother Committed Suicide With Children 14 Months Baby Boy Died
नेमकं काय घडलं?
गोंदिया-भंडारा जिल्हाच्या ठाणा गावात एका 35 वर्षीय आईनेच आपल्या पोटच्या मुला-मुलींसह स्वतः विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यात 14 महिन्याच्या कार्तिक शहारे या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर 5 वर्षीय विधी शहारे आणि 35 वर्षीय वंदना शहारे यांच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्ययात उपचार सुरु आहेत.
ठाणा गावातील ज्ञानेश्वर शहारे आणि त्यांची पत्नी वंदना शहारे हे 13 डिसेंबरला संध्याकाळी बाजारातून घरी परत आले. शहारे कुटूंबियांनी रात्री जेवण केल्यावर वंदना डोके दुखत असल्याचे कारण सांगत घरा शेजारी असलेल्या औषधांच्या दुकानात औषध घेण्यासाठी गेली. मेडिकलमधून तिने तांदळामध्ये टाकण्याचं औषध आणलं.
विष पिऊन झोपी गेले
वंदनाने आपल्या 14 महिन्याच्या मुलाला आणि 5 वर्षाच्या मुलीला हे औषध पाजले आणि स्वतःही ते प्राशन करुन झोपण्यासाठी गेली. मध्य रात्री अचानक मुला मुलींना उलट्या आणि मळमळ होत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. यानंतर या तिघांनाही तात्काळ उपचाराकरिता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे 14 महिन्याचा कार्तिकचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलगी विधी आणि वंदनाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. सध्या दोघांवरही उपचार सुरु आहे.
वंदनाने मुलांसह आत्महत्येचे इतके टोकाचे पाऊल का घेतले याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.