Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bear Attack : गुरे चारण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाचा हल्ला; गुराखी गंभीर जखमी

Bhandara News : भंडारा जिल्ह्यात दिवसेंदिवस जंगली प्राण्यांचा मनुष्यवरील हल्ल्यात वाढ होत आहे. जंगल परिसर असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : जंगलात गुरांना चारण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सदर गुराखी जखमी झाला आहे. अस्वलाच्या हल्ल्यात गुराखील गंभीर जखमा झाल्या असून त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात दिवसेंदिवस जंगली प्राण्यांचा मनुष्यवरील हल्ल्यात वाढ होत आहे. जंगल परिसर असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. यामुळे या भागात कधी बिबट्याचे हल्ले तर कधी अस्वलाचे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना भंडारा जिल्ह्यातील वाकल परिसरात घडली आहे. गुरांना जंगलात चराईकरीता नेले असताना जंगलात दबा धरून बसलेल्या (Bear) अस्वलाने गुरख्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना अड्याळ वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या वाकल येथे घडली आहे. 

सुरेश घनश्याम बोरकर (वय ३४) असे जखमीचे नाव आहे. अस्वलाने हल्ला केल्याने सुरेश हा जोरजोरात ओरडू लागला. यामुळे आवाज एकूण परिसरातील नागरिक धावत आले. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी सुरेशला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सद्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी शरीरात गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT