Bhandara Media Boat Drowned Video 
महाराष्ट्र

Boat Capsized Wainganga river : पत्रकारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीत बुडाली; CM शिंदेंच्या दौऱ्यावेळी दुर्घटना

Bhandara Media Boat Drowned Video: वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. त्या माध्यम प्रतिनिधींची बोट बुडाली.

Bharat Jadhav

भंडारा येथील वैनगंगा नदीवर मिडियाला घेउन जाणारी बोट बुडाल्याची घटना घडलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोटीचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अखेर बचाव पथक वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान या घटनेतील अधिकचा तपशील समजू शकलेला नाहीये. परंतु प्राथमिक माहितीनुसार ही दुर्घटना वैनगंगा नदीवर घडलीय. वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प उभारला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते झालं. भूमिपूजनाच्या वेळी जाताना पत्रकारांना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटली, त्यात तिचे तीन तुकडे झाले.

काय आहे प्रकल्प

वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाने रोजगारात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प उभारला जाणार आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १० हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटलं जात आहे. या प्रकल्पासाठी १०२ कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT