Bhandara Crime Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Crime : छत्तीसगडमधून चोरी करून तुमसरमध्ये दुचाकी विक्री; असा झाला भांडाफोड, आंतरराज्यीय दुचाकी चोर ताब्यात

Bhandara news : छत्तीसगड राज्यातून दुचाकी चोरून त्या तुमसर येथे आणून त्यांच्या नंबर प्लेटवर भंडारा जिल्ह्याच्या रजिस्ट्रेशन कोड लिहून विक्री करणाऱ्या आंतरराज्य दुचाकी चोरट्याला तुमसर पोलिसांनी जेरबंद केले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरी करायची. यानंतर नंबर प्लेट बदलवून त्यांची कमी किमतीत विक्री करण्याचा त्याचा धंदा सुरु होता. दरम्यान पोलिसांना याबाबत मिळालेल्या माहितीवरून त्याचे मोबाईल लोकेशन घेत त्याला भंडारा जिल्ह्यातील बुटीबोरी हिंगणा येथून ताब्यात घेतले आहे. यात आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरीच्या सर्व दुचाकी छत्तीसगड राज्यातून चोरल्याचे समोर आले आहे. 

छत्तीसगड राज्यातून दुचाकी चोरून त्या तुमसर येथे आणून त्यांच्या नंबर प्लेटवर भंडारा जिल्ह्याच्या रजिस्ट्रेशन कोड लिहून विक्री करणाऱ्या आंतरराज्य दुचाकी चोरट्याला तुमसर पोलिसांनी जेरबंद केले आहे. वाल्मीकी उर्फ बालू लोकचंद हरीणखेडे (वय ४२) असे त्याचे नाव असून तो पाथरी (ता. गोरेगाव, जि.गोंदिया) येथील आहे. झटपट पैसे कमविण्यासाठी त्याने दुचाकी चोरी करण्याचे सुरु केले होते. 

मोबाईल लोकेशनवरून घेतले ताब्यात 

दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील हॉटेल, शिव भोजन केंद्र व इतर गर्दीच्या ठिकाणी आपली ओळख सांगून वाल्मिकी हा जुन्या दुचाकी कमी किमतीत विक्री करायचा. याबाबत काहींना संशय आल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तुमसर पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. तर मोबाइल लोकेशन ट्रेस करून त्याला बुटीबोरी हिंगणा येथून ताब्यात घेतले आहे.  

तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी वाल्मिकी यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्यांची किंमत २ लाख ९० हजारांची असल्याचे सांगितले जाते. वाल्मीकी हा छत्तीसगड राज्यातील दुचाकी चोरी करून तुमसर शहरात आणायचा. येथे भंडारा एम.एच. ३६ अशी नंबर प्लेट तयार करून स्थानिक लोकांना विक्री करीत होता. यात किती लोकांना फसविले याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

SCROLL FOR NEXT