शुभम देशमुख
भंडारा : राज्यात सर्वदूर पावसाने हाहाकार माजविला आहे. काही ठिकाणी अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती भंडारा जिल्ह्यात पाहण्यास मिलर असून मुसळधार पावसाने आज अक्षरशः भंडाऱ्याला झोडपून काढलं. पहाटे सुरू झालेला हा पाऊस सुमारे दोन तास सतत पडला. यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून घरातील साहित्याची देखील नासाडी झाली आहे.
भंडाऱ्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. प्रचंड विजांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने शहरातील अनेक सखल भागात जलमयस्थिती निर्माण झाली. भंडारा शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं. नगरपालिकेच्या वतीने भंडारा शहरात भूमिगत पाईपलाईन आणि गडरलाईनचे काम करण्यात येत आहे. मात्र, त्याचं योग्य नियोजन नंनल केल्यानं या मुसळधार पावसाचा फटका भंडारा शहरवासींना बसला.
पाणी शिरल्याने घराला स्विमिंग टँकचे स्वरूप
भंडारा शहरातील राजगोपालाचारी वार्डात राहणारे भंडारा पोलीस विभागात कार्यरत असलेल्या निलेश खडसे यांच्या घरातही मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यानं त्यांच्या घराला स्विमिंग टॅंकचं स्वरूप आले आहे. यामुळे घरातील जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली असून घरातील साहित्य पाण्यावर तरंगायला लागले आहेत. घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळं पोलीस कर्मचारी निलेश खडसे यांनी स्वतः घरातील विदारक परिस्थिती दाखविणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला आहे.
पालघर जिल्ह्यात संततधार
पालघर : पालघर जिल्ह्यात मागील दोन तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. याशिवाय बोईसर, डहाणू, कासा, तलासरी परिसरात पावसाची संततधार सुरु असून आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तर भात शेतीसाठी पूरक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.