Gram panchayat Election Result Saam tv
महाराष्ट्र

Gram panchayat Election Result 2022 : भंडाऱ्यात अपक्षांचा बोलबाला; ठाकरे गटाचा भोपळा

भंडाऱ्यात अपक्षांचा बोलबाला; ठाकरे गटाचा भोपळा

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडाऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला राहिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि शिंदे गटाची समाधानकारक कामगिरी राहिली असून भाजप आणि राष्ट्रवादी (NCP) प्रत्येकी एकवर समाधानी रहावे लागले आहे. (Letest Marathi News)

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत 19 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. यात महिलाराज पहायला मिळाला आहे. तर तब्बल 13 ग्रामपंचायतीत महिला सरपंच म्हणून निवडणूक आले आहेत. विशेष म्हणजे पक्षांचा विचार करता अपक्षांचा बोलवाला पहायला मिळाला असून तब्बल 9 ग्रामपंचायती अपक्षाच्‍या ताब्यात गेली आहे.

भाजप, राष्‍ट्रवादी एका ग्रामपंचायतीवर

काँग्रेस आणि शिंदे गटाची कामगिरी देखील समाधानकारक असून कॉंग्रेसने 5 ग्रामपंचायती तर शिंदे गटाने 3 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. तर दूसरीकडे (BJP) भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर समाधानी राहिले आहे. दरम्यान ठाकरे गटाला भोपळा मिळालेला आहे.

पटोलेंच्‍या मतदार संघात कमळ

एक उल्लेखनीय बाब अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः भंडारा जिल्हाचे पालकमंत्री असतांना सुद्धा भाजप विशेष कामगिरी करु शकला नाही. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या यांच्या मतदार संघात कमळ फुलले आहे. एकंदरित अपक्षाची ही निवडणूक ठरली असून आता अपक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात हे पहाने विशेष महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US attacks Indian ship : अमेरिकेचा भारतीय जहाजावर हल्ला, 3 खलाशांचा मृत्यू

Pune : पुण्यातून अचानक ९ वर्षाची चिमुकली बेपत्ता, नेमकं झालं काय? पोलिसांनी कसं शोधलं?

हाडे होतील लोखंडासारखी मजबूत! कॅल्शियम वाढवण्यासाठी खा 'ही' भाजी

Pune curfew : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ग्रामीण भागात १५ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

Friday Horoscope : आयुष्यात काही तरी मोठं घडणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब बदलणार

SCROLL FOR NEXT