Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : भंडाऱ्यात मोठी दुर्घटना टळली; वर्दळीच्या परिसरातील विद्युत खांबाला आग

Bhandara News : विद्युत खांबाला अचानक आग लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. मात्र नागरिकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले अन् मोठा अनर्थ टळला.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकातील साई मंदिर मार्गावर मोठी दुर्घटना टळली. एका बँकेजवळील विद्युत खांबाला अचानक आग लागली. पहाता- पहाता आगीची तिव्रता वाढत असताना शेजारील लोकांच्या आग लागल्याची लक्षात येताच त्या ठिकाणी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. 

विद्युत खांबाला अचानक आग (Fire) लागल्याने नागरिकांची धावपळ उडाली होती. मात्र नागरिकांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले अन् मोठा अनर्थ टळला. मात्र आग कशी लागली याबद्दल स्पष्टता झालेली नाही. ज्या विद्युत खांबाला आग लागली त्याला लागूनच बँक, निमशासकीय कार्यालये, दुकाने तर दाट वस्ती आहे. हा परिसर वर्दळीचा आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वाढत्या (Temperature) तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात असला तरी लोकांच्या समयसुचकतेमुळे आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

सूर्यही तापतोय 

यंदा भंडाऱ्यातील (Bhandara) तापमानाने उच्चांक गाठला असून सूर्य आग ओकत आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच खांबाला आग लागल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये हरवलेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला

Low Blood Pressure: बीपी लो झाल्यास शरीरात दिसतात 'ही' गंभीर लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करु नका

Sharad Pawar : विधानसभेला १६० जागांची गॅरेंटी, शरद पवारांचा गौप्यस्फोट; ऑफर देणारे 'ते' दोघे कोण?

निवडणूक आयोगावर बोलल्यावर भाजपला का झोंबलं? आदित्य ठाकरेंचा सवाल | VIDEO

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं, भारतावर बेरोजगारीचं संकट?

SCROLL FOR NEXT