Bhandara News Yandex
महाराष्ट्र

Bhandara News: धक्कादायक! प्रसुतीनंतर डॉक्टर विसरले महिलेच्या पोटात कापड, तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील घटना

Rohini Gudaghe

शुभम देशमुख, साम टीव्ही भंडारा

तुमसर (Tumsar) येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणा महिलेच्या जीवावर बेतला आहे. नॉर्मल प्रसूती केल्यानंतर डॉक्टर कापड गर्भ पिशवीत विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला तिच्या पहिल्या प्रसुतीसाठी रूग्णालयात आली होती.

तिला २४ एप्रिल रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २५ एप्रिल रोजी तिची नॉर्मल प्रसुती झाली. परंतु, नॉर्मल प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होऊ नये, म्हणून गर्भ पिशवीत कापड ठेवले जाते. ते कापड ठेवल्यानंतर १२ ते २४ तासांच्या आत काढावे (Bhandara News) लागते. मात्र तुमसरमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते कापड न काढताच महिलेला २७ एप्रिल रोजी घरी सोडले.

घरी गेल्यावर तिन चार दिवसांनी या महिलेला वेदना असह्य वेदना होवु लागल्या. घरात देखील घाण वास येऊ लागला. त्यामुळे महिला घाबरली आणि तिने तात्काळ खाजगी रुग्णालय गाठलं. त्यावेळी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड असल्याचं (Doctor Left Clothes In Fetus) सांगितलं. हे ऐकल्यानंतर महिलेला धक्का बसला. वेळीच उपचार करून गर्भ पिशवीतून ते कापड काढण्यात आलं. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

मात्र, ते कापड २४ तासात काढलं गर्भपिशवीत पूर्ण सडलेल्या अवस्थेत होतं. त्यामुळे या महिलेच्या शरिरात इन्फेकशन देखील पसरलं होतं. या प्रकारच्या घटनांमुळे अनेक महिलांनी त्यांचा जीव देखील गमावलेला आहे. हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडला आहे. प्रसुती (Normal Delivery) दरम्यान वैद्यकीय अधीक्षक लहान मुलांचे डॉक्टरआणि स्त्रीरोग तज्ञ हजर राहत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत.

येथे फक्त परिचारीकेच्या जबाबदारीवर प्रसुती केलं जातं असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासन सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे अशा प्रकारच्या धोकादायक घटना घडल आहेत. या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी या महिलेच्या पतीने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT