Fraud Case
Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : फाटक्या नोटा असल्याचे सांगत महिलेस २१ हजारात गंडवले; विदर्भ कोकण बँकेतील प्रकार

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : बचत गटाचे चेक वठविण्यास बँकेत आलेल्या महिलेची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तुमसर शहरातील विदर्भ कोंकण बँकेत सकाळी घडला. दरम्यान सदर महिला घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर घडलेला प्रकार बँक व्यवस्थापकाला सांगितल्यानंतर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुर्गा रोशन पुंडे या सकाळी ५० हजार रुपयांचा चेक वाढविण्यासाठी बँकेत (Bank) आल्या होत्या. यावेळी चेक कॅश करून काउंटर सोडताना सदर महिलेशी एक प्रौढ इसम बोलत असल्याचे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाले आहे. याबाबत दुर्गा पुंडे यांना विचारणा केली असता सदर अनोळखी व्यक्ती तिला नोटा फाटक्या असल्याचे सांगत होता. त्याच वेळी नजर चुकवून त्याने महिलेजवळील २१ हजार रुपये लंपास करताना सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान बँकेत घडलेल्या विचित्र घटनेची प्रचिती दुर्गा पुंडे यांना घरी परतल्यावर आली. तिला बँकेत एक प्रौढ इसमाने तब्बल २१ हजार रुपयांनी गंडविल्याचे लक्षात आले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुर्गा पुंडे यांनी बँकेशी संपर्क साधून बँक व्यवस्थापकाला सदर घटनेची माहिती सांगितली. बँक प्रशासनाने बँकेतील सीसीटिव्हीचे रेकॉर्ड चेक केले असता चोरीचा विचित्र प्रकार समोर आला. व्यवस्थापकांनी तत्काळ तुमसर पोलिसांना पाचारण करून प्रकरण उघडकीस आणला. यानंतर त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती बँक व्यवस्थापकांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: "ती" वाघनखं महाराजांची नाहीत?

Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर डागलं हायपरसॉनिक क्षेपणास्त्र; २४ जण ठार

Marathi Live News Updates: उद्या नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Saie Tamhankar: आज मुकाट्यानं घरी बसा, मुसळधार पावसामुळे सई ताम्हणकरचे चाहत्यांना आवाहन

Andheri Sub Way News: मुंबईतील सब-वे पावसामुळे पाण्याखाली...

SCROLL FOR NEXT