Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : मामाच्या गावाला आलेल्या बहीण- भावाचा मृत्यू; गावालगतच्या डोहात अंघोळीसाठी गेले असता बुडाले

Bhandara News : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथून मृत दिव्या व प्रेम हे बहीण- भाऊ दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसोबत खडकी येथे मामाच्या गावाला आले होते

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: सध्या शाळांना सुट्या असून भाऊबीज आणि दिवाळीनिमित्त गावात असलेल्या मंडईच्या कार्यक्रमाकरिता मामाच्या गावाला आलेल्या दोन चिमुकल्या बहिण भावाचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यांतर्गत येणाऱ्या खडकी गावात घडली. 

सदरच्या घटनेत दिव्या वाढवे (वय 14) आणि प्रेम वाढवे (वय 8) असं मृतक बहिण भावाचे नाव आहे. दरम्यान दिवाळीची सुटी असून दिवाळी आणि भाऊबीजनिमित्ताने सासरवासिनी माहेरी येत असतात. त्यानुसार (Gondia) गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथून मृत दिव्या व प्रेम हे बहीण- भाऊ दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसोबत खडकी येथे मामाच्या गावाला आले होते. सुट्या असल्याने काही दिवस ते येथे थांबले होते. 

दरम्यान दिव्या आणि प्रेम हे दोघे त्यांच्या मामाच्या दोन मुलींसह गाव शेतशिवारात बकरी चराईसाठी गेले होते. यावेळी (Bhandara News) शेतात असलेल्या डोहात ते अंघोळीसाठी उतरले होते. मात्र डोहातील पाण्याचा अंदाज नं आल्यानं तिथे उतरलेल्या दोन्हीही बहीण भावांचा खोल पाण्यात गेले. यात त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती सोबत असलेल्या मुलींनी घरी दिली. यानंतर त्यांचा शोध घेत मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh : क्रिकेटच्या मैदानात एकाच वेळी 'दादा'गिरी आणि 'दरारा'; सिक्सर किंग युवराज सिंगवर मोठी जबाबदारी

2029 मध्येही काँग्रेसचा चौथ्यांदा पराभव होणार; अमित शाहांचं राहुल गांधींना आव्हान

Maharashtra News Live Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला; हल्लखोर महिलेकडून चाकू जप्त

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

SCROLL FOR NEXT