Bhandara News
Bhandara News Saamtv
महाराष्ट्र

Bhandara News: अतिक्रमण धारकांनो सावधान! भंडारा नगरपरिषद पुन्हा ऍक्शन मोडवर; कडक कारवाईचा दिला इशारा

Gangappa Pujari

शुभम देशमुख, प्रतिनिधी...

Bhandara News: भंडारा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून आता नगर परिषदेने अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कडक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे भंडारा शहरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा शहर नगर परिषदेकडून देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिवसेंदिवस भंडारा (Bhandara) शहरात रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असुन याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. रस्तावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून त्यासाठी नगर परिषदेने फेब्रुवारी महिन्या पासून अतिक्रमण हटाव मोहिम राबवित आहे. बरेच अतिक्रमण काढले असून पुन्हा रस्त्यांवर पान टपरी, चायनीज ठेले, किंव्हा घरगुती लोकांनी सुध्दा रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे.

अतिक्रमण धारकांना नगर परिषदेने नोटीस बजावले पण या नोटीसांकडेही अतिक्रमण धारकांनी दुर्लक्ष केले. त्यासाठी नगर परिषदेने अतिक्रमणावर बुलडोझर चालवीत पक्क्या घरांचे अतिक्रमण देखील काढले आहे.

जर पुन्हा अतिक्रमण केले तर तशी माहिती नगर परिषदेला देण्यात यावी असे आव्हानही नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नगर परिषदेने शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासठी नगर परिषदेने कंबर कसली असून आता अतिक्रमण धारकांवर थेट कारवाई केली जाणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT