Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: जादूटोण्याचा संशय; रात्री घराबाहेर बोलावून जबर मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

जादूटोण्याचा संशय; रात्री घराबाहेर बोलावून जबर मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : गावात जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून मध्यरात्री घराबाहेर बोलावून एका ४५ वर्षीय व्यक्तीला (Bhandara) बेदम मारहाण केली. हि घटना लाखांदूर तालुक्यातील चिचोली/अंतरगाव या गावात घडली. या प्रकरणी (Police) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव बेनीराम बळीराम रहिले (वय ४५) असे आहे. घटनेच्या रात्री बेनिराम हा स्वतःच्या घरी कुटुंबीयांसह झोपला होता. दरम्यान, गुलाब तरंडे बेनीरामच्या घरी पोहोचत खासगी कामाच्या बहाणा करून बेनीरामला घराबाहेर बोलविले. आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास आवाज देताच घराबाहेर पडलेल्या बेनीरामवर जादूटोणा केल्याचा आरोप करीत (Crime News) मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी पीडित व्यक्तीच्या घरालगत उपस्थित असलेल्या अन्य दोन व्यक्तींनी देखील बेनीरामला मारपीट केल्याचा आरोप केला आहे.

मारहाणीत बेनिराम गंभीर जखमी झाला आहे. जखमीला नागरिकांनी रात्रीच लाखांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  बेनिराम रहिले यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी चिंचोली येथील अरविंद दादाजी तुमन्ने (वय २८), गुलाब नंदलाल तरंडे (वय ३०) व संतोष केवळराम तुमन्ने (वय ४०) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लोकेश वासनिक तपास करीत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT