Bribe Case Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case: पोलीस निरीक्षकच अडकला एसीबीच्या जाळ्यात; १० हजार रुपयांची मागितली होती लाच

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : भंडारा शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक यांना लाच स्वीकारताना (Bhandara) अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातून मुलाचे नाव वगळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच (Bribe) मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)

भंडारा शहर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. तक्रारदार यांचा मुलास इतर तीन मुलांवर गुन्हा दाखल असून तक्रारदार यांच्या मुलाचा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठीच मुलाचे नाव वगळायचे असल्यास १५ हजार रुपयांची मागणी सहायक पोलिस (Police) निरीक्षक राजेश साठवणे यांनी केली होती. पण तडजोडी अंती १० हजार रूपये घेण्याची इच्छा दर्शविली. 

रंगेहाथ पकडले 

तक्रारदार यांची लाच देण्याची मुलाची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून १० हजार रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. आरोपी सहायक पोलिस निरीक्षक यांच्या विरूद्ध भंडारा शहार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT