stray dog  saam Tv
महाराष्ट्र

Dog ​Attack: शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; हल्ल्यात महिला गंभीर जखमी

Stray Dog : त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत घोरमारे

Bandara : भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील खरबी येथे पिसाळलेल्या कुत्राची दहशत पसरली आहे. येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने 4 जणांचा चावा घेतला आहे. तसेच एका महिलेवर या कुत्र्याने मोठा हल्ला केला आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. (Stray Dog)

या कुत्र्यामुळे परिसरात नागरिक भयभीत झालेत. घरातून बाहेर पडताना नागरिकांना भीती वाटत आहे. लहान मुलांना शाळेत अथवा परिसरात एकटे सोडणे कठीण झाले आहे. या कुत्र्याने आतापर्यंत 4 लोकांचा चावा घेतला आहे. तसेच एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यमुना महादेव नरखेडे (65, खरबी), माया ठवकर, सुरेश पाटिल अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांवरही पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेमुळे नागरिकांत व पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पिपंरी चिंचवड परिसरात देखील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवडच्या संत तुकारामनगर परिसरातील एका सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला होता. या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update : मुंबईत सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात कडक कारवाई; एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम

पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळला अर्धा कापलेला पाय, स्थानिकांचा थरकाप उडाला

Malaika Arora: मलाइकाचा फोटो वापरून पिंपरीत अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT