
Pitbull Dog Attack News : आजकाल कुत्रा पाळणे ही लोकांची फॅशन बनली आहे. पण तो कसा सांभाळायचा हेही कळायला हवं. आजकाल लोक कुत्र्यांना तो काहीही करणार नाही या विश्वासाने घरात मोकळे सोडतात. आजकाल कोणाच्या घरी बघा, एक ना दुसरा पाळीव कुत्रा नेहमी दिसतो. खेड्यापाड्यात त्याचे प्रमाण खूपच कमी असले तरी शहरांमध्ये त्याचा ट्रेंड शिगेला पोहोचला आहे. (Latest Marathi News)
काहींना पिटबुल, काहींना लॅब्राडोर तर काहींना जर्मन शेफर्ड हा कुत्रा पाळायला आवडतो. सामान्यतः असे दिसून येते की लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना आपल्या मुलांप्रमाणे ठेवतात, त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्या बदल्यात कुत्रे देखील त्यांच्याशी समान वागणूक देतात, परंतु कधीकधी त्यांचे आक्रमक रूप देखील दिसून येते. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे.
कुत्र्याला (Dog) जीव लावणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. पिटबुल जातीच्या कुत्र्याने महिलेचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन तिचा जीव घेतला आहे. ब्रिटनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एनी शील्ड्स (वय 67 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
गार्डन परिसारत वॉक करत असताना एनी यांना पिटबुल जातीचा कुत्रा जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी या कुत्र्यावर उपचार केले. यानंतर त्यांनी या कुत्र्याला शेल्टर होममध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व शेल्टर होम फुल होते. यामुळे त्या या कुत्र्याला आपल्या घरी घेऊन आल्या.
एनी त्या कुत्र्याला खूप जीव लावत होत्या. पण, प्रेमाच्या बदल्यात त्या पिटबुल जातीच्या कुत्र्याने भयानक शिक्षा दिली. घरात कुणीच नसताना पिटबुलने एनीवर हल्ला केला. अक्षरशः तुकडे तुकडे करुन त्याने एनी यांना संपवलं.
एनी यांची मुलगी घरी आली तेव्हा तिने एनी रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. तर, पिटबुलच्या तोंडाला रक्त लागले होते. हे दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ऐनी यांच्या मुलीने तात्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या (Police) मदतीने या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले आणि एनी यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.