Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : भंडाऱ्यात १७ हजार लाडक्या बहिणी अपात्र; विविध कारणांनी प्रस्ताव केले रद्द

Bhandara News : लाडकी बहीण योजना घोषित केली. यासाठी काही निकष ठरविण्यात आले होते. सर्वच महिलांना सरसकट योजनेसाठी पात्र करून योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यास सुरवात करण्यात आली

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: राज्य सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना सरसकट योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अर्जाची नव्याने पडताळणी करण्याचे जाहीर करण्यात आले. यात निकषात न बसणाऱ्यांना अपात्र केले जात आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात विविध कारणांमुळे १७ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. 

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना घोषित केली. यासाठी काही निकष ठरविण्यात आले होते. मात्र अर्ज अधिक असल्याने सर्वच महिलांना सरसकट योजनेसाठी पात्र करून योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यास सुरवात करण्यात आली होती. परंतु विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल असे जाहीर करण्यात आले. यासाठी प्राप्त अर्जाची पुन्हा छाननी करण्यास सुरवात झाली. 

तपासणीत १७ हजाराहून अधिक महिला अपात्र 

पात्र ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भंडारा जिल्ह्यातील १७ हजार १८३ लाडक्या बहिणींना विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितींच्या तपासणीत लाडक्या बहिणींचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ७८८ महिलांचे प्रस्ताव या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. 

१४ महिलांनी स्वतःहून सोडला लाभ 

दरम्यान अर्जाची पडताळणी करण्याचे जाहीर झाल्याने काही महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील १४ महिलांनी स्वतः लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. अपात्र ठरलेल्या महिलांकडून अगोदर दिलेले रक्कम परत घेणार नाही. मात्र, पुढील लाभासाठी त्या आता वंचित झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT