Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : भंडाऱ्यात हत्येचा थरार! धारदार शास्त्राने हत्या केली, मृतदेह रेल्वेरुळाजवळ नाल्यात फेकला

Bhandara Crime News : भंडाऱ्यातील गोवर्धन नगरमध्ये रेल्वे रुळांजवळ अज्ञात व्यक्तीचा गळा चिरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

भंडाऱ्यात रेल्वे रुळांजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला

घटना पाहताच परिसरात भीतीचे वातावरण

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे

पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

भंडारामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील गोवर्धन नगर भागातील रेल्वे रुळांच्या बाजूला आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची हत्या धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील गोवर्धन नगर भागातील रेल्वे रुळांच्या बाजूला आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळांलगत असलेल्या एका नाल्यात पडलेला होता. या व्यक्तीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केलेले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.

हा मृतदेह पाहताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.या हत्येची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच गोवर्धन नगर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या व्यक्तीच्या हत्येमागचं गूढं देखील अद्याप उलगडलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Inspiring Story: दिव्यांग कलावंत राशीच्या स्वप्नांना मिळणार भरारी; शिक्षणाचे स्वीकारले पालकत्व!

Wednesday Horoscope : नवरा-बायकोमधील प्रेम वाढेल, धनसंपत्ती मिळेल; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी

Ashok Kharat Case: शक्तीवर्धनासाठी पुढाऱ्यांना मधाचा चुना; राजकारण्यांना विकला 1 किलो मध,9 लाखाला?

Iran-US Conflict: इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेने इराणच्या दोन अटी नाकारल्या

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT