Latur News Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Bhandara Fraud News: धक्कादायक! नोकरीच्या नावाखाली भंडाऱ्यातील तीन तरुणींची फसवणूक; लाखो रुपयांना घातला गंडा

केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटनेमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन ही फसवणूक करण्यात आली आहे...

Gangappa Pujari

Bhandara News: नर्सिंग कॉलेजच्या तीन मुलींची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यामध्ये घडला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटनेमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन ही फसवणूक करण्यात आली असून चार आरोपींना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. (Bhandara Latest News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा येथील एरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या तीन मुलींची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थिनींशी रिद्धी पाटील नावाच्या बोगस फेसबुक आयडीवरून संपर्क साधला गेला.

तसेच या विद्यार्थिनींची ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आरोपींनी बनावट ई-मेल आयडीवरून त्यांना परीक्षेची नोटीस, प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिकाही पाठवली. एवढेच नाही तर, त्यांची परीक्षा घेतली आणि डीआरडीओमध्ये निवड झाल्याचे खोटे सांगितले गेले.

यानंतर या मुलींनी आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये गुगल पेच्या माध्यमातून १ लाख ७४ हजार ४८० रुपये ट्रान्सफर केले. पीडित तरुणींनी नियुक्तिपत्रासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ते सतत टाळाटाळ करत राहिले. यामुळे आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या अनुषंगाने तुमसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने आणखी लोकांना अशा प्रकारे फसवली असल्याची शक्यता असून लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आव्हान पोलिसांनी केले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT