Bhandara Crime News Pavani Taluka  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara Crime : प्रेमविवाहानंतर तरुणीने संपवलं जीवन; १ वर्षाची चिमुकली पोरकी, मन सुन्न करणारी घटना!

स्नेहा राहुल कावळे ( वय २५ वर्ष रा. आझाद चौक, पवनी) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे.

अभिजित घोरमारे

Bhandara Crime News : पती पत्नीमधील वाद काही नवीन नाही. संसाराचा गाडा हाकताना त्यांच्यात वादविवाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात तर काही वेळा ते विकोपालाही जातात. यातून पुढे भयावह घटना घडतात. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील पवनी तालुक्यात एका प्रेमविवाह केलेल्या तरुणीने विष प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली.  (Latest Marathi News)

या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहा राहुल कावळे ( वय २५ वर्ष रा. आझाद चौक, पवनी) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राकेश कावळे असं आरोपी पतीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शिवनाळा येथील स्नेहा हिचा पवनी येथील राहुल कावळे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर एका वर्षाने स्नेहाने एका गोंडस बाळाला जन्मही दिला. मात्र, काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. राहुल याने स्नेहाला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच दारू पिऊन त्याने स्नेहाला मारहाण (Crime News)करण्यास सुरूवात केली.

सुरूवातीला स्नेहाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दरवेळी राहुलकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने याची माहिती आपल्या वडिलांना दिली. दरम्यान, स्नेहाच्या वडिलांनी राहुल याची समजूत काढली. रविवारी स्नेहाच्या चुलत भावाचे लग्न असल्याने ती आपल्या माहेरी आली होती.

यावेळी राहुललने तिला परत मारहाण केली. त्यामुळे ती मानसिक तणावात गेली. हे असंच सुरू राहिलं तर मी एकेदिवशी जीव देईन, असं स्नेहाने आपल्या वडिलांना सांगितलं. दरम्यान, मंगळवारी स्नेहा आणि राहुल यांच्यात पुन्हा वाद झाला. यातून स्नेहाने विषारी औषध प्राशन केले.

सासरच्या मंडळींनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्नेहाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी (Police) राहुल कावळेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. स्नेहाच्या अचानक निघून जाण्याने एका वर्षाच्या बाळाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

Maharashtra Live Update: गिरगावचा महाराजा मुखदर्शन, गिरगावच्या महाराजा साकारतोय जगन्नाथ भव्यरूप

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

SCROLL FOR NEXT