Beed News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वयंपाक करत असताना अचानक पेट घेतल्याने घरातील ज्वलनशील पदार्थाचा भीषण स्फोट झाला. या घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
ही दु्र्देवी घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील आडस गावात गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. कमल आश्रुबा इंगळे (वय ३५, रा. आडस, ता. केज) असे मयत महिलेचे नाव, तर लोचनाबाई आश्रुबा इंगळे (वय ७० वर्ष) असे जखमी महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचा हा दिव्यांग असून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पान टपरी चालवतो व तेथेच पेट्रोल विक्रीसाठी ठेवतो. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरात मुलगी व आई दोघे मिळून स्वयंपाक करताना अचानक घराने पेट घेतला. (Crime News)
पेटते घर पाहून मायलेकींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक स्फोट झाला. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे कमल इंगळे या जळून जागीच ठार झाल्या तर आई भाजल्याने गंभीर जखमी झाली. हा स्फोट पेट्रोलचा झाल्याचा अंदाज आहे. पोलीस व धारुर अग्निशामक दल दाखल झाले आहे. या घटनेने आडस व परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.