Bhandara Crime News Saam tv
महाराष्ट्र

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लॉजवर जबरदस्ती अन् शारीरिक संबंध; १४ वर्षीय मुलीसोबत 'नको ते घडलं'

Bhandara Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका ३३ वर्षीय नराधमानं १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली.

Bhagyashree Kamble

  • भंडाऱ्यातून धक्कादायक बातमी समोर.

  • ३३ वर्षीय नराधमाने १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

  • लॉजवर नेत जबरदस्ती.

भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला फसवलं. तसेच शारीरिक संबंध ठेवलं. इतकंच नाही तर, लॉजवर नेत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

प्रकाश सुखदेवे (वय वर्ष ३३) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि पीडित महिला दोघेही मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. तर, पीडिता १४ वर्षिय मुलगी असल्याची माहिती आहे. आरोपीनं आधी पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. नंतर विविध ठिकाणी नेत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवला.

नंतर आरोपीनं मुलीला भंडारा शहराजवळील जमनी दाभा येथील साई लॉजवर नेलं. तिकडे आरोपीनं पीडितेच्या मनाविरूद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला अल्पवयीन मुलीनं विरोध केला. तरीही त्याने बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर तरूणीनं पळ काढण्याचा प्रयत्न केला.

१४ वर्षीय मुलीनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आंधळगाव पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 65 (1), 137 (2) पोक्सो अंतर्गत गुन्हा दखल करीत अटक केली. दरम्यान, लॉज मालकावर देखील सवाल उपस्थितीत करण्यात येत आहे. लॉज मालकानं परवानगी दिलीच कशी? असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. लॉज मालकावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

Caste Certificate: आईच्या जात प्रमाणपत्रावरून मुलांना मिळेल Caste Certificate, जात प्रमाणपत्राबाबत 'सुप्रीम' निर्णय

India vs South Africa 1st T20: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव; टीम इंडियाचा १०१ धावांनी शानदार विजय

SCROLL FOR NEXT