Bhandara Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Bhandara : ८ दिवसांच्या मुलीला स्कूल बॅगमध्ये भरलं, नदीकाठावर फेकून दिलं; रडण्याचा आवज ऐकून गावकऱ्यांची धाव

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यात स्कूल बॅगमध्ये भरलेले नवजात बाळ जिवंत अवस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने बचाव करत बाळाला रुग्णालयात दाखल केले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भंडाऱ्यात स्कूल बॅगमध्ये नवजात बाळ आढळले

  • बाळ अंदाजे ८ ते १० दिवसांचे

  • पोलिसांच्या तत्परतेमुळे बाळाचा जीव वाचला

  • बाळ सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराधीन

  • आरोपी पालकांचा शोध सुरू

माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे समोर आली आहे. एका अज्ञात निर्दयी मातेने किंवा पालकांनी आपल्या अवघ्या ८ ते १० दिवसांच्या मुलीला एका स्कूल बॅगमध्ये भरून नाल्याच्या काठावर बेवारस सोडून दिले. सुदैवाने, हे बाळ जिवंत असून सध्या सुरक्षित आहे.

मानेगाव (सडक) परिसरातील उद्घजित पाल सिंग भाटिया यांच्या शेतशिवारातून जाणाऱ्या नाल्याजवळ स्थानिकांना एक काळ्या रंगाची स्कूल बॅग पडलेली दिसली. संशय आल्याने जवळ जाऊन पाहिले असता, त्या बॅगमध्ये एक जिवंत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. कडाक्याच्या थंडीत आणि निर्जन स्थळी या बाळाला मरणाच्या दारात सोडून देण्यात आले होते.

या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव सडक येथील पोलीस पाटील सुरेश मते यांनी विलंब न लावता लाखनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले आणि बाळाला ताब्यात घेतले.पोलिसांनी तातडीने बाळाला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, बाळाला पुढील देखभालीसाठी आणि उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, बाळ साधारण ८ ते १० दिवसांचे असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.या चिमुरडीला तिथे कोणी सोडले? तिचे आई-वडील कोण? याचा शोध आता लाखनी पोलीस घेत आहेत. पोलीस हवालदार मिलिंद गभणे आणि पोलीस शिपाई कांतीस कराडे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नगर पालिके प्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटण्याचे खा. तटकरे यांचे संकेत

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

Raj Thackeray: ही नवीन प्रथा कुठून आली? प्रचारासंदर्भातील आयोगाच्या निर्णयावर राज ठाकरे संतापले

SCROLL FOR NEXT