Bhandara News Saamtv
महाराष्ट्र

Bhandara News: हृदयद्रावक घटना! पडक्या विहिरीत पडलेल्या कासवाला वाचवायला गेले अन् विपरित घडलं... २ युवकांनी गमावला जीव

Bhandara News Update: विहिरीत पडलेल्या कासवाला वाचवायला तिघे विहिरीत उतरले होते. ज्यामधील दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला..

Gangappa Pujari

शुभम देखमुख, प्रतिनिधी...

Bhandara News: भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या कासवाला वाचवायला गेलेल्या दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगेश जय गोपाल गोंधुळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेती कामांना वेग आलेच तर ग्रामीण भागात धान रोवणीसाठी धुमाकूळ सुरू आहे. अशातच भंडारा जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. लाखनी तालुक्यातील गढपेंढरी येथील अशोक गायधने या शेतकऱ्याच्या शेतात रोवणीचे काम सुरू होते. शेतात रोवणी सुरू असताना जवळ असलेल्या पडक्या विहिरीत मजुरांना कासव दिसला.

विहिरीत पडलेले कासव पाहून मंगेश जय गोपाल गोंधुळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव) आणि सुधीर मोरेश्वर हजारे हे तीन तरुण कासव काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र विहिरीत गॅस असल्याने तिन्ही पुरुष मजुरांना गुदमुरू लागले. हा सर्व प्रकार मजूर महिलांना लक्षात येताच ओरडा ओरड केली.

एकाला वाचवण्यात यश...

मात्र त्यांना वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य नसल्याने मजूर महिलांनी स्वतःच्या अंगावरचे कपडे (साडी) काढून त्यांचा दोर करून विहिरीत फेकले व त्यातील सुधीर मोरेश्वर हजारे या तरुणाचे प्राण वाचवले. मात्र या इतर दोघांचा या घटनेत दुर्देवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT