Bhandara News Saam TV
महाराष्ट्र

Bhandara News: शिजेंटा कंपनीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; शेती पिकाचं ५ लाखांचं नुकसान

Bhandara: कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, अशा शब्दांत शेतकऱ्याला उत्तर दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. कंपनीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे.

Ruchika Jadhav

शुभम देशमुख

Agriculture News:

भंडारा जिल्हा हा धान्य उत्पादक जिल्हा आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान्याची लागवड करत आहेत. मात्र धान्य शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. भाजीपाला पिकाकडे वळलेल्या अशाच एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

मोहाडी तालुक्यातील जांब येथील झलकराम बोरकर यांच्याकडे वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. त्यामुळे त्यांनी दोन एकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड करण्याचे ठरवले. त्यांनी मौदा येथील नर्सरीमधून शिजेंटा कंपनीचं टेट्रिस वाणाची 33 हजार रूपयांची 33 हजार झाडे खरेदी करून आणली. तसेच लागवड देखील केली.

आता फुलगोबिला फूल आलं व बाजारात विक्री करीता नेणार तितक्यात फुलगोबी खराब होऊ लागली. याची माहिती शेतकऱ्यांनी शिजेंटा कंपनीला कळविली. कंपनीचे कर्मचारी आले पण गोबी वातावरणामुळे खराब झाल्याचे त्यांनी सांगितले. पण बाजूच्या शेतकऱ्यांची गोबी वातावरणामुळे खराब झाली नाही मग माझी का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला.

त्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, अशा शब्दांत शेतकऱ्याला उत्तर दिलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी कंपनीवर गुन्हा दाखल करून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी कृषी विभागाकडे तक्रार देत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT