Bhandara News: कारल्याने केली कमाल, शेतकरी झाला मालामाल; वर्षाला १० लाखांचं उत्पन्न

Bhandara Farmer: शेतकऱ्याने तीळमात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धान शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळून तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड केली. यावर त्यांनी एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयाचे उत्पन्न घेतले.
Bhandara News
Bhandara NewsSaam TV
Published On

शुभम देशमुख

Bhandara:

राज्यात एकीकडे दुष्काळ पडला आहे. मात्र अशा परिस्थितही पारंपारीक शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यात एक शेतकरी कारल्यांची लागवड करून लखपती झाला आहे. लाखनी तालुक्यात येत असलेल्या खोलमारा येथील अमृत मदनकर याने तीन एकर शेतीत कारल्याची लागवड केली आहे. या शेतीतून त्याने भरगोस पैसे कमवलेत.

Bhandara News
Bhandara : तुमसरमध्ये राजसाेसपणे बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन, महसूल विभाग कारवाईचे धाडस दाखविणार का ?

भंडारा जिल्ह्यातील खोलमारा येथील प्रगतीशील शेतकरी अमृत मदनकर. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी दुष्काळाच्या छायेत त्यांना पारंपारीक धानाची शेती करावी लागत होती. मात्र त्यांना उत्पादन कमी आणि खर्च जास्त यायचा.

मात्र या शेतकऱ्याने तीळमात्रही खचून न जाता कृषी विभागाचा सल्ला घेत पारंपरिक धान शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळून तीन एकर शेतीत आधुनिक पद्धतीने कारल्याची लागवड केली. यावर त्यांनी एका वर्षात तब्बल दहा लाख रूपयाचे उत्पन्न घेतले.

ऐवढेच नव्हे तर कारल्यासोबत काकडी,वाल्याच्या शेंगा,चंदन,गाजर आणि इत्यादी पालेभाज्यांचे उत्पन्न ते घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत सरकारने प्रगतीशील शेतकरी म्हणून त्यांचा गौरवसुद्धा केला आहे.

कडू कारल्यांनी अमृत यांच्या जीवनात गोडवा निर्माण केलेला आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत बागायती शेतीकडे वळून आपल्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचा आदर्श या शेतकऱ्याने दिला आहे.

Bhandara News
Amravati crime: अमरावती हादरले..महाप्रसादाला नेण्याचे सांगत पाच जणांचा तरुणीवर अत्याचार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com