Bhandara Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं

Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात वैनगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार, पोलिसांचा शोध सुरू.

Alisha Khedekar

  • वैनगंगा नदी पुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

  • अमोल खोब्रागडे यांचा जागीच मृत्यू

  • तीन महिन्यांच्या मुलीवरून वडिलांचे छत्र हरपले

  • अपघातानंतर वाहनचालक फरार, पोलिस तपास सुरू

शुभम देशमुख, भंडारा

भंडाऱ्यात भीषण अपघात झाला आहे. जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आज पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव अमोल खोब्रागडे असे आहे. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा तुमसर येथील सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास तो आपल्या दुचाकीने देव्हाडा येथून तुमसरच्या दिशेने येत असताना, माडगी पुलावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, अमोलचा जागीच मृत्यू झाला. अमोल खोब्रागडे हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या तीन महिन्यांची चिमुकली मुलगी आहे. घराचा कर्ता पुरुष आणि नुकताच बाबा झालेल्या अमोलचा अशा अपघाती मृत्यू झाल्याने खोब्रागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरातून तीव्र संवेदना व्यक्त होत आहेत. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. अद्याप त्या वाहनाचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Highest Mileage Cars: भारतात विकल्या जाणारी सगळ्यात जास्त मायलेजची कार कोणती?

Maharashtra Live News Update: पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर

Back Acne Skin: पाठीवरच्या पिंपल्समुळे त्रस्त आहात? या 5 सोप्या टिप्स करा फॉलो

Young Heart Attack: दररोज ५ किमी धावतो, ना सिगारेट ना फास्टफूड, तरीही हृदयात २ स्टेंट्सची गरज, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Hardik Pandya: भर मैदानात राडा! हार्दिक पंड्या-मुरली कार्तिकमध्ये जोरदार भांडणं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

SCROLL FOR NEXT