BHANDARA-SAKOLI HIGHWAY HIT-AND-RUN ACCIDENT: TWO DHARGAON RESIDENTS KILLED, DRIVER ON THE RUN Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Bhandara Accident News : भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथे भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला आहे.

Alisha Khedekar

  • भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथे भीषण अपघात

  • भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

  • अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार

  • पोलिसांनी तपास सुरू केला आहे

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara National Expressway Accident News भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरून पायी जात असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव येथील पेट्रोलपंपासमोर घडली. या अपघातात कुंडलिक वालदे (वय ६३) आणि भिवा बोंदले (वय ७०) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही धारगाव येथील रहिवासी होते. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने ते पायी चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. मात्र जखमा गंभीर असल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, अपघात घडवून वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

या प्रकरणी कारधा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वेगामुळे आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमुळे धारगाव परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळंल

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT